दारू वाहतूक प्रकरणी होडावडा येथील एक ताब्यात…

5
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्ग एलसीबीची कारवाई; रिक्षासह १ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त…

वेंगुर्ले,ता.३०: बेकायदा गोवा बनवण्याची दारू वाहतूक केल्याप्रकरणी तुळस येथे एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. कीस्तू बस्ताव गोन्साल्वीस (वय ४५) रा. होडावडा असे संबंधिताचे नाव आहे. त्याच्याकडून ८१ हजाराच्या दारूसह ६० हजाराची रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई काल रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास जकात नाका परिसरात सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाकडून करण्यात आली. याबाबतची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. हवालदार प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, यशवंत आरमारकर यांनी ही कारवाई केली.