कणकवलीतील एका मंगल कार्यालयात बालविवाहाचा प्रकार…

14
2
Google search engine
Google search engine

गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू; शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांची सतर्कता…

कणकवली, ता.०१ : कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील एका मंगल कार्यालयात बालविवाहाचा प्रकार आज उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही कणकवली पोलीस ठाण्यात सुरू आहे.
कणकवली तालुक्यातील एका बाजारपेठेत राहणाऱ्या अल्पवयीन युवतीचा विवाह कणकवलीत एका मंगल कार्यालयात होत असल्याची खबर कणकवली तहसीलदार यांना शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी दिली. त्यानुसार तहसीलदार पवार यांनी तत्काळ महिला व बाल विकास अधिकारी अमोल पाटील, तसेच पोलीस ठाण्यात याची महिती दिली. श्री.पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तत्काळ मंगल कार्यालय गाठले. जेव्हा पाटील घटनास्थळी पोचले तेव्हा विवाह संपन्न झाला होता.
बालवधू आणि वर गाडीत बसून घरी जण्याच्या तयारीत होते श्री.पाटील यांनी चौकशी केली असता बालवधू ची जन्मतारीख ४ जून २००५ असल्याचे सांगितले. तोवर घटनास्थळी पीएसआय अनिल हाडळ यांनी दाखल झाले. पीएसआय हाडळ यांनी दिलेल्या माहितीनुसार बालवधू चा जन्मदाखला पाहिला असता वय १८ वर्षे पेक्षा कमी असल्याचे दिसून आले. बालविवाह झाल्याचे फोटो आणि व्हिडीओ शूटिंग आढळून आले आहे. तत्काळ नववधू आणि नवरा, मंगल कार्यालय मालक , वधू आणि वरांकडील मंडळींना पोलीस ठाण्यात आणले.
चाईल्ड लाईन जिल्हा समन्वयक प्रियांका घाडी, एफसीसी च्या समुपदेशक रोजा खडपकर, रिया सांगेलकर यांनी पोलीस ठाण्यात जात वस्तुस्थिती जाणून घेतली.विवाहित वधूचे वय १८ वर्षाहून कमी असल्यामुळे नवरा, नवऱ्याचे आणि बालवधू चे आईवडील, तसेच मंगल कार्यालय मालकावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.