मोती तलावातील गाळात अज्ञात तरुण रुतला… 

21
2
Google search engine
Google search engine

बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू; घटनास्थळी पोलीस व नागरिकांची गर्दी…

सावंतवाडी,ता.०२: येथील मोती तलावात एक अज्ञात तरुण गळया पर्यंत चिखलात बुडाला आहे. तो तलावाच्या पात्रात चालत गेला.मात्र त्या ठिकाणी असलेल्या गाळात रुतला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

येथील मोती तलावातील पाणी गाळ काढण्यासाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ आहे. मात्र हा तरुण आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पात्रात चालत गेला. त्या ठिकाणी असलेल्या काळात रुतला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून नागरिकांच्या मदतीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.