डॉ. दुर्भाटकरांना जानकीबाई सुतिकागृहात समाविष्ट करून घ्या…

8
2
Google search engine
Google search engine

रक्तदाता संघटनेची मागणी; संस्थेचे विश्वस्त मिलिंद खानोलकरांना निवेदन…

सावंतवाडी,ता.०३: येथील स्त्री रोग तज्ञ ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांना भाईसाहेब सावंत महाविद्यालयाच्या प्रसिद्धी विभागात सामावून घेण्यात यावे, अशी मागणी रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेचे विश्वस्त डॉ. मिलिंद खानोलकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

श्री. दुर्भाटकर हे कुटीर रुग्णालयातून नुकतेच निवृत्त झाले आहेत. मात्र सावंतवाडी तसेच परिसरातील लोकांना सेवा मिळण्यासाठी राणी जानकीबाई सुतिकागृहात त्यांना समाविष्ट करून घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी दिले आहे. लोकांना चांगली सेवा मिळण्यासाठी लवकरात लवकर याबाबत सकारात्मक धोरण ठरविण्यात यावे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.