अबिद नाईक यांचा सामाजिक आदर्श, विज तारांना अडचण ठरणारी झाडे स्वखर्चाने तोडली…

9
2
Google search engine
Google search engine

नगसेवक असलो, नसलो तरी तुमच्या सोबत; शिवाजीनगर जळकेवाडीतील नागरिकांनी मानले आभार…

कणकवली,ता.०५: राष्ट्रवादीचे माजी नगसेवक अबिद नाईक यांनी आज आपल्या शिवाजीनगर जळकेवाडी येथील वॉर्डातील झाडे स्वखर्चाने तोडुन दिली आहे. पावसाळ्यात विज पुरवठा खंडीत होवू नये म्हणून त्यांनी पुढाकार घेवून हा उपक्रम राबविला आहे. दरम्यान आपण नगरसेवक असलो आणि नसलो तरी जे लोक माझ्या पाठीशी राहिले त्यांच्यासाठी आपण कायम झटत राहणार असल्याचा शब्द यावेळी नाईक यांनी दिला. त्यांनी दाखविलेले सहकार्य लक्षात घेवून संबंधित रहिवाश्यांनीही त्यांचे आभार मानले.

यावेळी बळीराम आडेलकर, मिलिंद वालावलकर, नितीन नाईक, दिवाकर मुरकर, महेंद्र मुरकर, नंदकिशोर गुरसाळे, सत्यविजय चिंदरकर आदी नागरिक उपस्थित होते. श्री. नाईक यांना राजकीय जीवनात नगरसेवक म्हणून यशस्वी करण्यासाठी त्यांच्या या वॉर्डातील नागरिकांना मोठा वाटा होता. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेवून हे काम केले, असे सांगितले. तसेच भविष्यात सुध्दा आपण त्यांना सहकार्य करणार असल्याचा शब्द दिला.