मिठबांव येथील विवाहिता मुलीसह बेपत्ता…

20
2
Google search engine
Google search engine

देवगड,ता.१४: मिठबांव-फाटकवाडी येथे आपल्या आईकडे राहत असलेली नमिता बाळकृष्ण लोके(२६) ही विवाहीता आपल्या लहान मुलीसह बेपत्ता झाली आहे. ती २ जुन ला सायंकाळी घरातून बाहेर पडली. याबाबत पतीने देवगड पोलिस स्टेशन येथे खबर दिली आहे. बेपत्ता झालेल्या महिलेचे पती बाळकृष्ण हे नोकरीनिमित्त मुंबईत राहतात तर पत्नी आपल्या मुलगी निधी हिच्यासमवेत गेली वर्षभर तिच्या आईकडे मिठबांव येथे राहत होती.
नमिता ही दि.२ जुन ला सायंकाळी ५ वाजता आपण मुलीला घेवून पतीकडे मुंबईला जाते असे सांगुन घराबाहेर पडली. मुंबईला जाण्यासाठी गाडीत बसल्यानंतन तिने फोन करून पतीलाही मुंबईला मुलीला घेवून येत असल्याचे सांगितले. गाडीत बसल्यानंतर पतीबरोबर फोनवर रात्री १० वाजेपर्यंत ती बोलली मात्र नंतर तिने फोन उचलला नाही व दुसऱ्या दिवशी सकाळी ती मुंबईलाही पोहचली नाही. पतीने संपर्क करूनही तिचा संपर्क झाला नाही व तिचा शोध लागला नाही म्हणून देवगड पोलिस स्थानकात पत्नी व मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली असून तपास महिला पोलिस नाईक, अमृता बोराडे करीत आहेत.