तळकट कोलझर परिसरात हत्तीकडून मोठ्या प्रमाणात नुकसान

10
2
Google search engine
Google search engine

 

दोडामार्ग,१६: तळकट कोलझर परिसरात गेलेले हत्ती दिवसा जंगल परिसरात तर रात्री बागायतीत प्रवेश करत आहेत.असे असले तरी त्यांच्याकडून होत असलेल्या नुकसानीची तीव्रता तिलारी खोऱ्यापेक्षा कमी आहे.
पाच हत्तींचा कळप तळकट मधून तळकट देऊळवाडी व कोलझर मध्ये गेला होता.कळप काल रात्री तळकट येथे गाड.राऊत व सावंत कुटुंबीयांच्या बागेत तर कोलझर येथे भरत देसाई यांच्या बागायतीत गेला. हत्ती या भागात फिरून पुन्हा तळकटच्या दिशेने जाऊन तळकट बादे या ठिकाणी दिवसाच्या मुक्कामाला जातात . हत्तींनी त्या भागात काही प्रमाणात केळी बागायतीचे नुकसान केले आहे. तर फार कमी प्रमाणात सुपारीच्या झाडांचे नुकसान केले आहे. ग्रामस्थ व वनकर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे त्या भागात हत्तींचा उपद्रव कमी आहे; परंतु हत्ती या भागात असेच राहिल्यास त्यांचा मुक्काम दीर्घकाळ वाढण्याची भीती आहे.त्या ठिकाणी हत्तींना योग्य प्रमाणात खाद्य व मुबलक पाणीसाठा मिळत असल्याने हत्ती स्थिरावण्याची भीती आहे. वनविभागाने त्या भागातून हत्तींचा मुक्काम अन्य भागात वळवून त्यांना कर्नाटकच्या दिशेने पाठविण्याची उपायोजना करावी अशी मागणी तळकटचे माजी सरपंच रामचंद्र सावंत यांनी केली आहे.