सावंतवाडी शिवसेना महिला तालुका प्रमुख पदी भारती कासार…

26
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता. १७: येथील शिवसेनेच्या महिला तालुकाप्रमुख पदी भारती भरत कासार यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच देण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत, महिला जिल्हाप्रमुख जानवी सावंत, तालुका प्रमुख रुपेश राऊळ व शिवसेना नेते बाळा गावडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
सौ. कासार यांनी शाखाप्रमुख, विभाग प्रमुख व उप तालुकाप्रमुख या पदांची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे ही महिला तालुका प्रमुख पदाची नवी जबाबदारी पक्षाने सोपविली आहे.