आकारी पड जमिनी मूळ मालकांना परत मिळण्यासाठी प्रयत्न करणार…

37
2
Google search engine
Google search engine

सुधीर सावंत यांचे आश्वासन; १६ जुलैला वाडोस येथे शेतकऱ्यांचा मेळावा घेणार…

सिंधुदुर्गनगरी,ता.१९: आकारीपड जमिनी मूळ मालकांना परत मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी १६ जुलै ला वाडोस येथे शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी यांनी आज दिली.
सिंधुदुर्ग मध्ये सरकारच्या नावे असलेल्या आकारीपड जमिनी मूळ मालकांना परत मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खास बैठक घेणार आहे. शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी वहिवाटी असूनही शेकडो एकर जमिनी सरकारच्या नावे आहेत. सिंधुदुर्ग मध्ये जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सरकारने मालकी हक्क लावला, मात्र या जमीन मालकांची वहिवाट असली तरी या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सरकारी मालकी असल्यामुळे त्यांना आकारीपड जमिनी म्हणून संबोधले जाते. शेतसारा भरला नाही व पिके घेतली नाहीत या कारणास्तव १९६० पासून अशा जमिनीवर सरकारने मालकी हक्क लावला आहे. १९८० पर्यंत या जमिनी परत केल्या जात होत्या. त्यानंतर या जमिनी परत करण्याचे काम थांबविले. सिंधुदुर्गमध्ये शेकडो एकर जमिनी सरकारी मालकीच्या राहिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या जमिनीवर शासकीय योजना राबवून लागवड करून उपभोग घेता येत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आकारीपड जमिनी शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी खास पाठपुरावा करणार असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक बोलावून त्यांचे खास लक्ष वेधणार असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे.त्यासाठी १६ जुलै ला सकाळी १० वाजता वाडोस (सावंतवाड़ी) येथे खास शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात येईल. अशी माहिती सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कृषी महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ विलास सावंत, भास्कर काजरेकर, अब्दुल शेख, मनवेल फर्नांडिस, अनघा रामाने आदी उपस्थित होते.
शेतीचे वन्य प्राण्यांपासून नुकसान
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्य प्राण्यापासून शेती व बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे . वन्य प्राण्यांचा जो शेतकऱ्यांना त्रास होत आहे त्याचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी सरकारने पाऊले उचलली पाहिजेत. त्यावर चर्चा करण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी १५ जुलै ला सकाळी १० वाजता ओरोस येथे शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर या बाबत शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहेत. तरी या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहुन आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले आहे.