जिल्ह्यातील अनेक तरुण अंमली पदार्थांच्या आहारी…

3
2
Google search engine
Google search engine

अर्पिता मुंबरकर ; तरुणांना व्यसनापासून परावृत्त करूया…

मालवण, ता. १९ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५० पेक्षा जास्त तरूण वर्ग अंमली पदार्थाच्या आहारी आहेत. जिल्ह्याच्या दृष्टीने ही धोकादायक बाब आहे. त्यामुळे तरूणांना अंमली पदार्थाच्या सेवनापासून परावृत्त करूया असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी येथे केले.
राज्यात नशामुक्त भारत पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने समाजकल्याण विभाग, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र, मालवण पोलीस स्थानक, मालवण न्यायालय यांच्यावतीने नशाबंदीवर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवाणी न्यायाधीश अमरदिप तिडके, सहदिवाणी न्यायाधीश महेश देवकते, अॅङ रूपेश परूळेकर, अॅङ अक्षय सामंत आदि उपस्थित होते.
श्रीमती मुंबरकर म्हणाल्या, भारत हा तरूणांचा देश आहे. परंतु भारतातील आज तरूण व्यसनांच्या आहारी गेलेले दिसतात. आपण ज्यावेळी एक किंवा अनेक व्यसनांना जवळ करतो तेव्हा एक किंवा अनेक संकटांना जवळ करतो. व्यसनांमुळे अनेक प्रकारचे शारिरिक मानसिक, सामाजिक दुष्परीणाम होतात. त्यामुळे व्यसनाला माणसाचा एक नंबरचा शत्रू मानले जाते. नशेचे पदार्थ यांचे शरिरावर होणारे दुष्परीणाम अत्यंत वाईट असतात. जर तंबाखूचे सेवन थांबवले नाही तर २०३० पर्यंत जगातील सुमारे १०० कोटी लोक तंबाखूपासून होणाऱ्या रोगामुळे मृत्यू पावतील. तसेच इतरही व्यसनाने लोक मृत्यू पावतील. त्यामध्ये २० ते ३० वर्षे वयोगटातील ४० टक्के लोक असू शकतील. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅङ अक्षय सामंत यांनी केले.