आम्ही साहेबां सोबतच…!!

16
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी राष्ट्रवादीची भूमिका; गांधी टोप्या घालून पवारांचे समर्थन…

सावंतवाडी,ता.०३: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर कोण कुठे जाईल, याबाबत चर्चा सुरू असताना सावंतवाडी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आज आम्ही साहेबांसोबत, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. यावेळी तशा आशयाच्या गांधी टोप्या लक्ष वेधत होत्या. येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे यांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका जाहीर करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर अध्यक्ष देवा टेमकर, हिदायतुल्ला खान, सायली दुभाषी काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी, इफ्तिकार राजगुरू, जावेद शेख, चित्रा देसाई, जावेद शेख आदी सहभागी झाले होते.