काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे स्वागत…

16
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. ०५ : येथील पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची आज ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी व तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेत शाल, श्रीफळ देत स्वागत केले.
यादरम्यान झालेल्या भेटीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी श्री. अंधारी, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष देवानंद लूडबे, पराग माणगावकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.