वेतोबा मालिकेचे सावंतवाडीत धुमधडाक्यात “लॉन्चिंग”…

20
2
Google search engine
Google search engine

खेम सावंतांच्या हस्ते पुजा; प्रेक्षकांचा नक्कीच प्रतिसाद मिळेल, उमाकांत पाटील…

सावंतवाडी,ता.१७: नवसाला पावणारा देव म्हणून कोकणात ओळख असलेल्या वेतोबाच्या नावाने चालविल्या जाणार्‍या सिरीयलला येथील प्रेक्षकवर्ग नक्कीच मोठा प्रतिसाद देतील, असा विश्वास वेतोबाची भूमिका साकारत असलेल्या कलाकार उमाकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान यावेळी राजवाड्यात उभारण्यात आलेल्या ३० फुटी वेतोबाच्या प्रतीकृतीकडे सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज्ञी श्रध्दा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आरती व पुजा करण्यात आली. त्यानंतर येथील वैश्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, मला ही मालिका करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.नवसाला पावणारा देव अशी ख्याती वेतोबाची आहे. ही मुख्य भूमिका करताना अतिशय आनंद होत असल्याचे कलाकार उमाकांत पाटील यांनी सांगितले. ही भूमिका साकारण्या करिता शरीर मजबुतीसाठी अथक प्रयत्न करावे लागले देवाची भूमिका पहिल्यांदाच साकारण्याचा प्रयत्न करीत आहे; या भूमीके बद्दल सर्व माहिती ही यूट्यूबच्या सहाय्याने प्राप्त केली. या मालिकेची शूटिंग मळगाव येथे चालू आहे.

ही मालिका गावांमधील काही धार्मिक चालू घडामोडींवर आधारित असल्याचे ते म्हणाले. सन मराठी ही वाहिनी आम्ही घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत या मालिकेचे डायरेक्टर नितीन काटकर, लेखक राजेंद्र घाट यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे कलाकार उमाकांत पाटील यांनी सांगितले.

यावेळी मालिकेचे सर्व कलाकार दीपक कदम अक्षता कांबळी, विवेक गोरे, तसेच सावंतवाडी संस्थांचे लखम राजे भोसले, शुभदादेवी भोसले, श्रद्धा भोसले इनरवेल क्लबचे अध्यक्षा रिया रेडीज, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, विश्वस्त प्रसाद प्रभुसाळगावकर, आरवली गावचे माजी सरपंच मयूर खानोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.