जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत मिलाग्रीसची हर्षिता देवरुखकर जिल्ह्यात प्रथम…

11
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१८: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “स्वराज्य महोत्सव” या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये मिलाग्रीस हायस्कूलची विद्यार्थीनी हर्षिता संदिप देवरुखकर हिने इयत्ता ५ वी ते ७ वी या गटामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्दल तीला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.