माणगाव-डोंगरवाडी येथे राहत्या घराची भिंत कोसळून हजारोंचे नुकसान…

15
2
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.२१: माणगाव-डोंगरवाडी येथील रत्नप्रभा कृष्णा गुडेकर यांच्या राहत्या घराची मातीची भिंत मुसळधार पावसाने काल कोसळली. गुडेकर यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. तसेच माजी सरपंच सचिन धुरी आणि तलाठी शेनवी यांनी नुकसानीचा पंचनामा केला. या घरात एकटीच रहात असुन घर जमीनदोस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी संबंधित प्रशासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे.