जीवनात केवळ संपत्ती मिळवणे म्हणजे यश नाही… 

33
2
Google search engine
Google search engine

रुपेश पाटील; यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत परिश्रम आवश्यक…

कुडाळ,ता.२४: जीवनात केवळ संपत्ती मिळवणे म्हणजे यश नाही तर समाजात प्रतिष्ठा पद मिळण्यासाठी योग्य ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी लागते त्यालाच यश म्हणतात, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील यांनी हुमरस येथे केले. यश मिळवण्यासाठी प्रचंड जिद्द, मेहनत आणि कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे. तरच आपण जीवनात यशस्वी होऊन यथोचित शिखर गाठू शकतो, असे त्यांनी सांगितले.

हुमरस ग्रामपंचायतीत आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिराच्या प्रसंगी ते बोलत होते.