भाजपाच्या संदिप गावडेंकडूून मळगाव-तळवडेत वह्या वाटप…

23
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२८: भाजपाचे पदाधिकारी तसेच युवा कार्यकर्ते संदिप गावडे यांच्या माध्यमातून आज मळगाव व तळवडे येथील हायस्कुल मध्ये वह्या वाटप करण्यात आल्या. गेली सहा वर्षे श्री. गावडे यांच्याकडुन आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात हा उपक्रम राबविण्यात येेतो. मात्र यावर्षी त्यांनी या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचे आज मळगाव येथून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती राजू परब, पंकज पेडणेकर, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, चंद्रकांत जाधव, माजी उपसरपंच गणेश पेडणेकर, उदय शिरोडकर आदी उपस्थित होते.