जिल्ह्यातील ७६ पदवीधर शिक्षकांना नवीन वेतनश्रेणी मंजूर…

18
2
Google search engine
Google search engine

ओरोस,ता.०९: पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नियुक्त झालेल्या जिल्ह्यातील ७६ पदवीधर शिक्षकांना नव्या धोरणानुसार वेतनश्रेणी मंजूर झाली आहे. तसे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीय सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. याबाबत शिक्षक समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

त्यात असे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पवित्र पोर्टलमधून नियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षकांना तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर एस- १० वेतनश्रेणी ऐवजी एस – १४ वेतनश्रेणी मंजूर झाली असून याचा लाभ जिल्ह्यातील ७६ पदवीधर शिक्षकांना मिळणार आहे. याबाबतचे उपसचिव ग्रामविकास विभाग यांचे मंजुरीचे पत्र मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना निर्गमित केले असून त्याची प्रत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग यांना प्राप्त झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पवित्र पोर्टलमधून नियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षकांवरील अन्याय दूर होवून त्याना एस -१४ वेतनश्रेणी लागू होण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी सकारात्मक पद्धतीने हा प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांची भेट घेवून संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. संतोष पाताडे, राज्य उपाध्यक्ष श्री. दयानंद नाईक, मालवण तालुकाध्यक्ष दिनकर शिरवलकर, संतोष कोचरेकर विनेश जाधव, प्रज्योत सावंत, चेतन मागाडे, रवी राठोड, सचिन ठाकरे, गणेश आजबे, किरण पवार, जयवंत कुंभार, रवी चव्हाण, गोरख जगधने, महेश व बहुसंख्येने पदवीधर शिक्षक उपस्थित होते.

तसेच शिक्षक भारती संघटनेने सातत्यपूर्ण व प्रामाणिक प्रयत्न करून हा प्रश्न सोडविल्याबद्दल नवनियुक्त पदवीधर शिक्षकांनी शिक्षक भारती संघटनेचे आभार व्यक्त केले आहेत.