दीपक केसरकर मित्र मंडळाचे “गुरु गौरव सेवा पुरस्कार” जाहीर…

12
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०४: मंत्री दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने देण्यात येणारा गुरु सेवा गौरव पुरस्कार तालुक्यातील नेहा सावंत आणि किशोर वालावलकर तर दोडामार्ग मधील दीपक गवळी व नंदकिशोर म्हापसेकर व वेंगुर्ले तालुक्यातील सिताराम नाईक यांना जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती मित्रमंडळाचे पदाधिकारी राजन पोकळे यांनी दिली.

पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र, शाल श्रीफळ, स्मृतिचिन्ह, ग्रंथ असे आहे. कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे व मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपक्रमशील व चांगले शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गुरुसेवा पुरस्कार २०२३ देऊन गौरव केला जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातुन दोन-एक प्राथमिक व एक माध्यमिक तसेच विशेष काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे. यामध्ये अंगणवाडी ते महाविद्यालयीन उपक्रमशील शिक्षक-शिक्षिकांची निवड केली जाते

सावंतवाडी तालुक्यातील सौ. नेहा नरेंद्र सावंत ( जि.प.शाळा इन्सुली नं.१ ), श्री. किशोर अरविंद वालावलकर , ( कलंबिस्त हायस्कूल कलंबिस्त ) दोडामार्ग तालुक्यातील – श्री. दीपक नामदेव गवळी, ( जि.प. शाळा साटेली भेडशी ) श्री. नंदकिशोर पांडुरंग म्हापसेकर, ( माध्य. विद्यालय सोनावल ) वेंगुर्ला तालुक्यातील – श्री. सिताराम अर्जुन नाईक , (जि. प.शाळा उभादांडा ) सौ. रेश्मा भालचंद्र चोडणकर , (दाभोली हाय. दाभोली,) कुडाळ तालुक्यातील सौ. श्यामल चंद्रकांत धुरी, ( जि.प. सरस्वती विदयालय कालेली ) , सौ. दर्शना सुनिल वराडकर , (कसाल हाय. कसाल ), मालवण तालुक्यातील- श्री. दिपक केशव गोसावी, ( जि.प. शाळा धामापूर ) , सौ. दिव्यता दिनेश परब, ( हिराबाई भा. वरसकर, विद्यामंदीर वराड ) कणकवली तालुक्यातील- श्री. संजय गोपाळ सावंत ,( जि.प. शाळा फोंडा ), श्री. पी.जे कांबळी , ( विद्यामंदीर हाय. कणकवली ) देवगड तालुक्यातील – श्री. दिनेश सुरबा दळवी , ( जि.प. शाळा जामसंडे नं.1) , श्री. अनिल देविदास घुगे, ( डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हाय. मुटाट ) वैभववाडी-तालुक्यातील सौ. ज्योती जयवंत पवार ( वि.भ.करुळ गावठण शाळा ) श्री. संतोष यशवंत मोहिते , ( बालभवन विदयामंदिर मौदे ) यांना जाहीर झाला आहे

अंगणवाडी ते महाविदयालय विशेष सन्मान पुरस्कारात श्री. कमलाकर सीताराम ठाकूर, ( केंद्रप्रमुख सावंतवाडी ) श्रीम. अर्चना एकनाथ आंबेलकर , (अंगणवाडी शिक्षिका ) सौ. माधवी मंगेश मसके, ( कुडाळ ) सौ. अनुराधा हरिश्चंद्र पवार, (अंगणवाडी जि प शाळा नं.2 सावंतवाडी ) , तसेच श्री. महेश लाडु सावंत, ( तळवडे नं.3 ) श्री. अरविंद नारायण सरनोबत , ( जि.प. शाळा माडखोल- धवडकी ), श्री. भिवा केशव सावंत, (आडेली नं.1 ) श्रीम. पूनम यशवंत खोराटे , ( बोडदे ) श्री. उदय वामन शिरोडकर , ( केंद्रप्रमुख ) श्री. शरद अर्जुन नारकर , ( नाधवडे नं.1 ) सौ. अश्विनी आनंद राणे, ( अंगणवाडी इन्सुली डोबाची शेळ ), श्रीम. आनंदी रघुनंदन घोगळे  ( डी . एड . कॉलेज मालवण ) यांना जाहीर करण्यात आला आहे. तर गुरूसेवा गौरव पुरस्कार सन २०२३ ची निवड समिती – श्री. भरत गावडे, श्री.विठठल कदम, श्री. म.ल.देसाई, श्री. अजय सावंत, श्री. आर . बी. गावडे, श्री. नारायण नाईक असून सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी उपनगराध्यक्ष श्री. राजन पोकळे व मित्र मंडळाच्या पदाधिका-यानी अभिनंदन केले आहे.