मनसे नेते परशुराम उपरकर यांनी घेतले कार्यकर्त्यांच्या घरी गणेश दर्शन…

4
2
Google search engine
Google search engine

 

सावंतवाडी,ता.२३: मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज सावंतवाडी वेंगुर्ले येथे जावून कार्यकर्त्यांच्या घरी गणेश दर्शन घेतले. यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, विद्यार्थी सेना जिल्हा सचिव निलेश देसाई, सहसचिव आबा चिपकर, तालुकाध्यक्ष संदेश सावंत, स्वप्निल कोठावळे, मंदार नाईक, प्रकाश साटेलकर, नंदू परब, सुनील नाईक, ज्ञानेश्वर नाईक आदी उपस्थित होते.