वीज वाहिन्या तुटल्यामुळे नेमळेत वीज पुरवठा खंडित…

22
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०१: मुसळधार पडलेल्या पावसामुळे भले मोठे जांभळाचे झाड वीज तारांवर कोसळल्यामुळे नेमळे दोन पोल तुटून नुकसान झाले आहे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज मंडळाकडून प्रयत्न सुरू आहे. हे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
गेल्या चार-पाच दिवसात पडलेल्या पावसामुळे हे झाड नेमळे-पाटकरवाडी येथे मुख्य रस्त्यावर कोसळले होते. ते दुर करण्यात आले. परंतु वीज पुरवठा अद्याप सुरळीत झाला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.