बांदा-वाफोली रस्त्याखाली नव्याने मोठे पाईप घाला…

11
2
Google search engine
Google search engine

प्रशांत बांदेकर; पावसाळ्यात पाणी तुंबून नुकसान होत असल्याचे म्हणणे…

बांदा,ता.०१: कट्टा कॉर्नर येथील परिसरात पाणी साचू नये यासाठी बांदा-वाफोली रस्त्याखाली नव्याने मोठे पाईप घालण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी महामार्ग विभागाकडे केली आहे. त्याठीकाणी असलेले पाईप छोटे असल्यामुळे पावसाचे पाणी तुंबून लगतच्या वस्तीत व दुकानात शिरते. त्यामुळे मोठे नुकसान होते. सद्यस्थितीत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. आपल्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली आहे.

बांदा वाफोली रस्त्याच्या बाजूला एक नाला असून पावसाळ्यात पाण्याचा निचरा याच नाल्यातून होत असतो. परंतू या नाल्यासाठी वापरण्यात आलेले पाईप खूपच लहान असल्याने एक दोन तास जरी मोठा पाऊस पडला तरी या नाल्यातून पाणी योग्य प्रमाणात जात नाही. परीणामी पाणी रस्त्यावर येते व वाहतूक पूर्णपणे बंद होते. शिवाय आजूबाजूच्या दुकानांचे सुद्धा पाणी शिरून नुकसान होते.

सदर मोरीचे काम हे महामार्गचे काम करताना करण्यात आले होते. महामार्ग विभागाकडून याठिकाणी उड्डानपुलाचे काम सुरु आहे त्यामुळे याठिकाणी पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी मोठे पाईप टाकण्यात यावे.