शस्त्रक्रिये दरम्यान हृदयविकाराचा झटका, शिरोड्यातील महिलेचे निधन…

26
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०७: गर्भाशयाची शस्त्रक्रिया करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने महिलेचे निधन झाले. ही घटना आज सायंकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात घडली. विशाखा विकास परब (वय४८, रा. शिरोडा-परबवाडी) असे तिचे नाव आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सकाळी त्या उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. मात्र शस्त्रक्रिया सुरू असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.