रुग्णालयाच्या परिसरात असलेली धोकादायक भिंत तात्काळ पाडा…

19
2
Google search engine
Google search engine

सामाजिक बांधिलकीची मागणी; बांधकामसह रुग्णालय प्रशासनाला निवेदन…

सावंतवाडी,ता.१२: येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात असलेली संरक्षक भिंत धोकादायक आहे. त्यामुळे ती तात्काळ पाडण्यात यावी व त्या ठिकाणी नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक बांधिलकी संघटनेच्या माध्यमातून आज सार्वजनिक बांधकाम व रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच ही इमारत तात्काळ पाडण्यात यावी, अन्यथा कोणताही अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत बांधकामचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवाळे यांना देण्यात आले. यावेळी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते संजय पेडणेकर, शैलेश नाईक, रवी जाधव, हेलन नीब्रे, समिरा शेख आदी उपस्थित होते.