लाच स्वीकारल्या प्रकरणी सावंतवाडीचा “एपीआय” जेरबंद…

47
2
Google search engine
Google search engine

दिड लाखाची केली मागणी; आणखी एक अधिकारी रडारवर…

सावंतवाडी,ता.१२: एक लाखाची लाच स्वीकारल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रायगड लाच लुचपत विभागाच्या पथकाकडून करण्यात आली. दरम्यान त्यांच्यासमवेत आणखी काही अधिकारी अडकण्याची शक्यता आहे.