राष्ट्रवादीच्या अर्चना घारे वेळागर ग्रामस्थांच्या पाठीशी…

3
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.१५: शिरोडा-वेळागर येथील पंचतारांकित हाॅटेल साठी अधिकची घेण्यात आलेली गावठाणची जागा वगळण्यात यावी यासाठी तेथील ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. जोपर्यंत संबंधित ग्रामस्थांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादी म्हणून त्यांच्या पाठीशी राहू, असे त्यांचे म्हणणे आहे. आज घारे यांनी ग्रामस्थांची भेट घेतली.
यावेळी वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, माजी सभापती जयप्रकाश चमनकर, सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष अजित नातू, अरवली ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मेस्त्री, राजेंद्र आंदुर्लेकर, हनुमंत गवंडी, विनोद आरोसकर, अजय आमरे, बबन पडवळ व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.