सातार्डा येथील कामगारांचा उपचारा दरम्यान मृत्यु…

14
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०६: सातार्डा येथील कामगाराचे उपचारादरम्यान निधन झाले. अलगू दयाराम सहानी (वय ५६) असे त्याचे नाव आहे. त्याच्या प्रकृतीत आज पहाटे बिघाड झाला होता. त्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी मळगाव प्राथमिक केंद्र दाखल करण्यात आले होते.परंतु उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. याबाबतची खबर त्याचे नातेवाईक अनिल सहानी यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.