आसोली हायस्कूलमध्ये हिंदी दिनानिमित्त “हिंदी मानक वर्तनी” स्पर्धा-परीक्षा संपन्न…

2
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले ता.१५: आसोली हायस्कूलमध्ये हिंदी दिना निमित्त घेण्यात आलेल्या “हिंदी मानक वर्तनी” स्पर्धा-परीक्षेत कु.दिया महादेव धुरी हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर कु. सायली गंगाराम पाटलेकर व कु. रुचिका विष्णू केरकर यांना अनुक्रमे द्वितीय-तृतीय क्रमांक देण्यात आला. उत्तेजनार्थ म्हणून कु. आदित्य रमेश जाधव व कु.प्रांजली प्रविण पवार यांना गौरविण्यात आले.

प्रशालेच्या वतीने हिंदी दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सौ. विशाखा वेंगुर्लेकर यांच्या हस्ते संत तुलसीदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
यानिमित्ताने घेण्यात आलेल्या “हिंदी मानक वर्तनी” स्पर्धा-परीक्षेत प्रशालेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान या स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना सौ.वेंगुर्लेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तर शिक्षक विष्णू रेडकर व सौ. भावना धुरी, श्री. जाधव यांचे सहकार्य लाभले. दरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष उदय धुरी व सेक्रेटरी सदानंद गावडे अभिनंदन केले.

\