राजा गावकर यांची जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रित सदस्यपदी वर्णी…

20
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. ०३ : शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा गावकर यांची जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली आहे.
राजेंद्र उर्फ राजा गावकर हे जनसामान्यातील एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण कुडाळ मध्ये झाले तर उर्वरित शिक्षण स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे झाले. त्यानंतर मार्केटिंग क्षेत्रात मालवण तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोको कोला कंपनी एजन्सी व त्याच कंपनीमध्ये नोकरी करत असताना संपूर्ण तालुका व जिल्ह्यात झालेली ओळख याचा वापर राजकारणासाठी करून घेतला. त्यांनी राजकारणाची सुरुवात प्रभाग निरीक्षक म्हणून केली. सुरुवातीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कै. दीपक मयेकर यांच्या जवळचे मित्र असल्याने त्यांच्याच साथीने राजकारणात पदार्पण केले. त्यावेळी एक प्रभाग निरीक्षक म्हणून पहिले पद मिळाले पुढे जाऊन नितीन वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दीपक केसरकर यांच्या नेतृत्वात मालवण तालुकाध्यक्ष हे पद यशस्वीरित्या पाच वर्षे सांभाळले. त्या काळात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने मंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या ध्येय धोरणांची अधीन राहून तालुक्यातील विविध विकास कामांना चालना दिली. त्यावेळचे मंत्री उदय सामंत, भास्कर जाधव यांचेही ते निकटवर्तीय मानले जातात. त्यानंतर राजकारणातील काही वाद विवादामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करून सुद्धा मेहनत, निष्ठा कितीही असली तरी २०१४ पालिकेच्या निवडणुकीत त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे ते राजकारणापासून पाच वर्ष अलिप्त राहिले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर चे सदस्यत्व स्वीकारले. मग पुन्हा एकदा शिवसेनेत शिंदे गट स्थापन झाल्यानंतर नव्याने राजकारणात मंत्री उदय सामंत आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विनंतीला मान देऊन राजकारणात सक्रिय झाले. त्यांची तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.