चौकुळ येथे जुगार अड्ड्यावर छापा, दोघे ताब्यात…

690
2
Google search engine
Google search engine

आंबोली पोलिसांची कारवाई; काहीजण पळून जाण्यास यशस्वी…

सावंतवाडी,ता.१४: चौकुळ येथे जुगार खेळल्या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई आंबोली पोलिसांनी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भावई मंदिर परिसरातील केली. शुभम शामसुंदर वर्दम (वय २७, रा. पांजरवाडा-सावंतवाडी) व सुदर्शन देवराव मुळीक (वय ६३, रा. मुळीकवाडी-मळेवाड) अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे तर काही जण पळून जाण्यास यशस्वी झाले. ही कारवाई पोलीस हवालदार मनीष शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आली. याप्रकरणी त्या दोघांवर जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार पुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याचे ठाणे अमंलदार ज्योती दुधवडकर यांनी दिली.