घरकाम सांभाळून महिलांनी आपल्या आवडी-निवडी जोपासायला हव्यात…

301
2
Google search engine
Google search engine

प्रियंका गावडे; निरवडेतील सरपंच चषक क्रीडा स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन…

सावंतवाडी,ता.१५: निरवडे ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेला महिला क्रिडा स्पर्धा उपक्रम स्तुत्य आहे. घरकाम सांभाळून आपल्या आवडीनिवडी जोपासत विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन महिलांनी भरारी घ्यावी, असे आवाहन सावंतवाडी पंचायत समितीच्या माजी सभापती प्रियंका गावडे यांनी केले. निरवडे येथे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच चषक महिला क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेचे उद्घाटन सौ. गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच सुहानी गावडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर ग्रामपंचायत सदस्य धर्माजी गावडे जयराम जाधव,अंगारिका गावडे आदींसह ग्रामस्थ आणि गावातील बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

यावेळी सरपंच गावडे म्हणाल्या,गावातील महिलांना योग्य संधी मिळाल्यास त्या गुणवत्ता दाखविण्याचा प्रयत्न करतात.महिलांच्या कलागुणांना संधी मिळण्यासाठी निरवडे गावात आम्ही महिला क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. आजच्या धकाधकीच्या युगात घर, संसार,परिवार आधी सर्व जबाबदाऱ्या सांभाळत घरातील महिला स्वतःच्या चेहऱ्यावरील हास्य विसरत चालले आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी महिलांनी दिवसातील काही वेळ स्वतःसाठी द्यायला हवा. यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

गावातील ३५ पेक्षा जास्त बचत गटातील महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. रस्सीखेच,गोळाफेक,चमचा गोटी,संगीत खुर्ची,बास्केटबॉल, प्रश्नमंजुषा सिंधुदुर्ग जिल्हा आधारित खेळ खेळण्यात आले. यावेळी विजेत्यांना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व महिलांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश तोरसकर यांनी केले.