वाफोली माऊली मंदिरात २२ ला विविध कार्यक्रमांचे आयोजन…

81
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.१९: २२ जानेवारीला विश्वातील भारतीयांचे आराध्य दैवत आणि श्रध्दास्थान असलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थानी अर्थात अयोध्या येथे रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा साजरा होणार आहे. या प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिर येथे ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त सकाळी ८ वाजता सर्व देवी देवतांची विधिवत पूजा, रामरक्षा याग १०८ वेळा श्री राम जय राम जय जय राम हा नाम जप, श्री रामरक्षा स्रोताचे पारायण, मारुती स्रोताचे पठण, सकाळी ११ वाजता श्री रोहन बुवा पुराणिक (परुळे ता. कुडाळ) यांचे प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनावर कीर्तन, दुपारी १२ वाजता आरती व सामुदायिक गाऱ्हाणे, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी दीपोत्सव, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी वाफोली पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भजन रसिकानी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी माऊली पंचायतन स्थानिक सल्लागार उपसमिती, वाफोली प्रमुख मानकरी, वाफोली हितवर्धक ग्रामस्थ संस्था, मुंबई व वाफोली ग्रामस्थ यांनी केले आहे.