वेर्ले-फौजदारवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचा अशोक दळवींच्या हस्ते शुभारंभ…

266
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१९: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वतीने वेर्ले-फौजदारवाडी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी २० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्या कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रेमानंद देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, संजयगांधी निराधार समिती अध्यक्ष गजानन नाटेकर, वेर्ले सरपंच सौ. सुचिता राऊळ, उपसरपंच मोहन राऊळ, ग्रामपंचायत सदस्य सौ. पल्लवी राणे, दिलीप राऊळ, बाळा गावडे, लाडजी राऊळ, चंद्रकांत राऊळ, सुनिल राऊळ, सुभाष राऊळ, सुरेश राऊळ, ज्ञानदेव लिंगवत, प्रितेष राऊळ, अब्जू सावंत, संदेश सोनुर्लेकर, एकनाथ हळदणकर, सदा कदम, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.