आरवली वेतोबा मंदिरात २२ ला विविध कार्यक्रमांचे आयाेजन…

101
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.१९: श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी,आरवली तर्फे, २२ जानेवारीला श्री क्षेत्र अयोध्या येथे होणान्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या, निमित्त श्री देव वेतोबा मंदिर, आरवली येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२१ जानेवारीला सकाळी १०.०० वाजल्यापासून संध्याकाळी ४.०० पर्यंत खुली रांगोळी स्पर्धा “राम रंगावली” होणार आहे. तर सोमवार २२ जानेवारीला सकाळी १० वाजता श्रीराम प्रतिमा पूजन, दुपारीः-१२.३० वाजता महाआरती, दुपारीः-१.३० वाजता महाप्रसाद, तीर्थ प्रसाद, सायं:- ४.०० ते ६.०० सामुहिक श्रीराम रक्षा स्तोत्र पठण, नामस्मरण, सायं:- ६.०० ते ८.३० पर्यंत ब्रह्मनाद आरवली वेंगुर्ला, श्री रविंद्र पणशीकर आरवली आणि सहकारी प्रस्तुत “गीतरामायण” हा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून रामसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी, आरवली यांनी केले आहे.