पोलीस पाटील उमेदवारांसाठी २५ जानेवारीला एकदिवसीय कार्यशाळा…

119
2
Google search engine
Google search engine

 

मालवण, ता. २४ : ओबीसी व आरक्षित महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने २५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत मामा वरेरकर नाट्यगृह येथे तालुक्यात पोलीस पाटील पद भरतीसाठी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ओबीसी व आरक्षित महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी दिली.

या प्रशिक्षण कार्यशाळेत पोलीस पाटील पदभरतीसाठीच्या लेखी परीक्षेचे स्वरूप व प्रश्नपत्रिका सोडवतानाची घ्यावयाची काळजी, अपेक्षित प्रश्न याबाबत तज्ञ मार्गदर्शक माहिती देणार आहेत. ही प्रशिक्षण कार्यशाळा सर्व प्रशिक्षणार्थींसाठी मोफत असणार आहे. तालुक्यात पोलीस पाटील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. वाळके यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी https://chat.whatsapp.com/JbyRRMeanUw2GUvZDj1IZX हा दुवा वापरून उमेदवारांनी वॅाटसअप गटात सहभागी व्हावे.