राज घराण्याचे दशावतारी कलाकारांना प्रोत्साहन देणे कौतुकास्पद…

119
2
Google search engine
Google search engine

रवींद्र कुलकर्णी; राजवाडा परिसरात दशावतार महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात…

सावंतवाडी,ता.२५: दशावतार ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक कला आहे, ही कला जोपासण्याचं काम राजघराण्याच्या वतीने केले जात आहे. राजघराणे अशा कलांना प्रोत्साहन देत आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मुंबई विद्यापीठाच्या वतीने सुद्धा कोकणातील विविध कलांचा अभ्यास करण्यासाठी कलादालन उभारण्यात आले आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या विद्यमाने राजवाडा परिसरात दशावतार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजे खेमसावंत भोसले, कार्याध्यक्षा राणी शुभदादेवी भोसले, यांच्या हस्तेे करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज लखमसावंत भोसले, युवराज्ञी

श्रद्धाराजे भोसले, प्राकुलगुरू डॉ. अजय भामरे, विविध विभागांचे अधिष्ठाता डॉ. अनिल सिंग, डॉ. सुनील पाटील, डॉ. माधव राजवाडे, डॉ. किशोरी भगत, डॉ. वेलिंग, जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस दांडेली, व वालावलकर दशावतार नाट्य मंडळ ओसरगाव यांचे मालक नाथा नालंग, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियमक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल. भारमल, दिलीप गोडकर, डॉ. डी.जी बोर्ड, डॉ. एस. एम बुवा महाविद्यालयाचा प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी तसेच दशावतार नाट्यरसीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.