शिवसेना कार्यकारीणीची उद्या कणकवलीत बैठक…

55
2
Google search engine
Google search engine

पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे; संदेश पारकर, संजय पडतेंचे आवाहन…

कणकवली,ता.२७: शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना कार्यकारिणीची बैठक उद्या २८ जानेवारीला दुपारी ३ वाजता कणकवली विजयभवन येथे होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद होईल.
या बैठकीला खासदार विनायक राऊत, उपनेते अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, उपनेत्या जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव हे उपस्थित राहणार आहेत. तरी शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख व इतर प्रमुख प्रदाधिकारी यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे.