नेमळे येथे जखमी अवस्थेत आढळलेल्या बगळ्याला प्राणी मित्राकडून जीवदान…

132
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०१: नेमळे येथे जखमी अवस्थेत आढळून आलेल्या बगळ्याला तेथिल प्राणी मित्र ओंकार गावडे यांने वनविभागाच्या हवाली केले, यावेळी वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी त्याच्यावर पशुवैदयकीय दवाखान्यात उपचार करुन त्याला नैसगिक अधिवासात सोडले, त्याच्या पंखाना व पायांना दुखापत झाल्यामुळे तो जखमी झाला होता, तसेच त्याला उडता येत नव्हते.

नेमळे फौजदारवाडी येथे रस्त्याच्या बाजूला तो श्री. गावडे यांना आढळून आला, यावेळी त्याने त्या बगळ्याला दुचाकीवरुन सावंतवाडीत आणले व वनविभाग कर्मचार्‍यांच्या ताब्यात दिले.