बांदा नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे लोकप्रतिनिधींकडून स्वागत…

107
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.०२: येथील पोलिस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडगे व पोलीस उपनिरीक्षक शिवराज झंझुर्णे यांचे बांदा पंचक्रोशीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर, बांदा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, कास सरपंच प्रविण पंडित, निगुडे माजी सरपंच समीर गावडे, डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, रोणापाल ग्रामपंचायत सदस्य योगेश केणी आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. बडगे म्हणाले, आम्ही आपल्या सेवेसाठीच आहोत. सर्वांच्या सहकार्याने पंचक्रोशीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करू व सर्व प्रकारच्या गैरकृत्यांना आळा घालु, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.