“सेलिब्रिटी स्कूल” संकल्पनेच्या माध्यमातून मुलांना गायन कलेचे धडे…

92
2
Google search engine
Google search engine

दिपक केसरकर; विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्याचे विद्यार्थी घडतील…

सावंतवाडी/नितेश देसाई,ता.१०: आगामी काळात राज्यात “सेलिब्रिटी स्कूल” ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या संकल्पने अंतर्गत जागतिक स्तरावरील गायक, कलाकार यांच्या माध्यमातून मुलांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा आज येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. विज्ञाना प्रदर्शनाच्या माध्यमातून मुलांच्या अंगात असलेल्या कलागुणांना वाव मिळणार आहे. त्याच बरोबर त्यांना शैक्षणिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी आमच्या सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. येथे आयोजित करण्यात आलेल्या ५१ व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितनांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी श्री. केसरकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले ही हुशार आहेत, गेली १४ वर्षे येथील मुलांचे पासिंग पर्सेंटेज हे महाराष्ट्रात सर्वाधिक आहे, त्यामुळे सिंधुदुर्गातील मुलांना सायन्स मधील विविध प्रयोग पाहता यावे व संपूर्ण महाराष्ट्रातील मुलांना कोकणची सुवर्णभूमी पाहता यावी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

५० वे विज्ञान प्रदर्शन हे गेल्यावेळी पुणे येथे आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित मुलांना पुण्याची संस्कृती पहाता यावी म्हणून प्रयत्न केले गेले होते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला, समुद्रकिनारा तसेच भारतातील एकमेव स्कुबा डायव्हिंग सेंटर पाहता यावे म्हणून प्रयत्न केले गेले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी याचे नियोजन केले आहे असे ते म्हणाले.

यावेळी श्री. केसरकर यांनी सिंधुदुर्गात दाखल झालेल्या मुलांना समुद्रकिनारी आनंद लुटण्यासाठी जात असताना नियमांचे पालन करून आनंद लुटण्याचे आवाहन केले आहे, त्याचबरोबर सिंधुदुर्गातील मुलांना पाच दिवस चालणारे हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे असे सांगितले व सिंधुदुर्गातील भूमिपुत्रांनी विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने सावंतवाडीत येणाऱ्या मुलांचे व सायन्स शिक्षकांचे स्वागत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, भोसले नॉलेज सिटीचे अच्युत भोसले, मुख्याधिकारी सागर साळुंखे, पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, शिक्षणाधिकारी श्री. कुडाळकर, सावंतवाडी बी.डी.ओ वासुदेव नाईक, गट शिक्षणाधिकारी सौ. बोडके, अशोक दळवी, डॉ. राधा अतकरी, अन्नपूर्णा कोरगावकर, राजन पोकळे, अमेय प्रभू, नारायण राणे, राहूल रेखावर, मकरंद देशमुख, कृष्णकुमार पाटील, डॉ. अर्चना सावंत, कुणकेरी सरपंच सोनाली सावंत, ॲड. निता कविटकर, महेश चोथे, आबा केसरकर, नंदू गावडे, नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.