आगामी निवडणुका मनसे स्वबळावर लढणार… 

304
2
Google search engine
Google search engine

गजानन राणे; जिल्ह्यातील आरोग्य प्रश्न सुटण्यासाठी गांभीर्याने लक्ष देणार…

सावंतवाडी ता.११: आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभा निवडणुका या ठिकाणी मनसे स्वबळावर लढविणार आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. संघटना नवीन असली तरी पक्ष जूना आहे.त्यामुळे लोक आम्हाला नक्कीच स्वीकारतील,असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे यांनी आज येथे व्यक्त केला.

येणाऱ्या काळात आरोग्याच्या प्रश्नाकडे मनसेकडून गांभीर्याने लक्ष दिला जाणार असून येणाऱ्या काळात जिल्ह्यातील आरोग्य केंद्र रुग्णालय व आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज येथे आयोजित ते पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले आम्ही या ठिकाणी नव्याने संघटना बांधत असलो तरी पक्ष जूना आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्या दृष्टीने आमची संघटना बांधण्याचे काम सुरू आहे. येणाऱ्या काळात निश्चितच आम्हाला यश मिळणार आहे. लोकांचे प्रश्न हाताळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. संघटना वाढत आहे अनेक लोक पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच चांगले दिवस येतील.

 यावेळी पक्ष निरीक्षक तथा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य संदीप दळवी, सावंतवाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब, जिल्हाअध्यक्ष अनिल केसरकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, बाळा पावसकर, सुधीर राऊळ, कुणाल किनळेकर, गुरुदास गवंडे, सचिन सावंत, प्रभोद राऊळ, मिलिंद सावंत, हेमंत जाधव, सचिन पाटणकर, राजेश मामलेदार, अतुल केसरकर, नरेश देऊलकर, अक्षय पार्सेकर, काशीराम गावडे, विष्णू वसकर, साई तळकटकर, अभिजित खांबल, नाना देसाई, अभिमन्यू गावडे, श्रीराम सावंत, संदेश शेट्ये, प्रतिक मालवणकर, सुनील आसवेकर आदी उपस्थित होते.