पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा… 

81
2
Google search engine
Google search engine

नवलराज काळे; भटके विमुक्त आघाडीच्या बैठकीत उपस्थितांना आवाहन…

सिंधुदुर्गनगरी,ता.१३: आपण पूर्ण जबाबदारीने ही पदाची जबाबदारी स्वीकारलात. या पदाच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळेल अशा प्रकारचे कार्य सर्वांच्या हातून घडेल या पद्धतीचे काम आपण सर्वांनी करायचे आहे, असे आवाहन भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी केले. पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र सिंधुदुर्गनगरी येथील भाजप जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी काळे बोलत होते.

भारतीय जनता पार्टी जिल्हा मध्यवर्ती कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला जिल्हाध्यक्ष भाजपा प्रभाकर सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी राहुल भैया केंद्रे यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी जाहीर केली होती. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रभारी बाळा गोसावी उपस्थित होते. या जाहीर केलेल्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते संपन्न झालेल्या जिल्हा बैठकीत देण्यात आले. यावेळी प्रभाकर सावंत यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या बैठकीत बेलदार भटका समाज संघ सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी मध्ये भाजपा भटके विमुक्त आघाडीचे काम करणारे पदाधिकारी यांच्या निवडी झाल्या होत्या. त्यामध्ये बेलदार भटका समाज संघ जिल्हाध्यक्षपदी मारुती नामदेव मोहिते, जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश दादा जाधव, जिल्हा सल्लागारपदी अशोक आप्पा मोहिते, तर जिल्हा कायदेशीर सल्लागार पदी ॲड.पूजा जाधव यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनचा ठराव घेण्यात आला. या सर्वांना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन आघाडीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. या बैठकीमध्ये येणाऱ्या काळात विधानसभा निहाय भाजप भटके विमुक्त आघाडीचे तीन मेळावे जिल्ह्यात करण्याबाबत नियोजन करण्यात आले.

या बैठकीत जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी जिल्हा पदाधिकारी व मंडळ अध्यक्ष यांना मार्गदर्शन करताना येणाऱ्या काळात प्रत्येक तालुका मंडळ कार्यकारणी पंचायत समिती शक्ती केंद्रप्रमुख,बूथ निहाय बूथ, गाव अध्यक्ष पदाच्या निवडी भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या वतीने करण्यात याव्यात,अश्या निवडी आम्ही काही भागात सुरु देखील केलेल्या आहेत. आपण सर्वांनी यात लक्ष देवून या निवडी करून घ्याव्यात. येणाऱ्या काळात या निवडी आपली आघाडी भक्कम करेल आणि आपल्याला काम करायला सोपे पडेल. त्याचप्रमाणे या सभेमध्ये जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रभारी बाळा गोसावी यांनी देखील उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. उपस्थित पदाधिकाऱ्यांपैकी काही सूचना आल्या त्या नोंद करण्यात आल्या सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मारुती मोहिते, जिल्हा सरचिटणीस दीपक खरात, जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम कार्लेकर, जिल्हा उपमीडिया प्रमुख राजू इंगळे, कणकवली शहर तालुकाध्यक्ष मऱ्याप्पा इंगळे, कणकवली ग्रामीण तालुकाध्यक्ष संदीप होळकर, देवगड तालुका अध्यक्ष संतोष साळस्कर, मालवण तालुका शहराध्यक्ष अशोक मोहिते, मालवण तालुका ग्रामीण अध्यक्ष संजय शिंगाडे, वैभववाडी तालुका अध्यक्ष गंगाराम उर्फ बाबु अडुळकर, वेंगुर्ले तालुका अध्यक्ष मनीष नाना कोळेकर, कुडाळ ओरोस मंडल अध्यक्ष लक्ष्मण भैरव खरात, सावंतवाडी तालुका मंडलाध्यक्ष गणेश दादा जाधव, सावंतवाडी आंबोली मंडल अध्यक्ष दीपक पाटील व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.