माघी गणपतींचे वैभव नाईक यांनी घेतले दर्शन…

226
2
Google search engine
Google search engine

कुडाळ-मालवण मध्ये भेटी; विविध मंडळांच्या वतीने सत्कार…

मालवण,ता.१३: माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ व मालवण तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित गणेश जयंती उत्सवांना भेट देऊन श्री गणेश मूर्तींचे दर्शन घेतले. यामध्ये शिरवंडे सिद्धगड, हिवाळे, मसदे, चौके-आंबेरी, धामापूर सडा, कुडाळ शहरात कविलकट्टा, वक्रतुंड सोसायटी, बाळा वेंगुर्लेकर घर, कुडाळ एसटी डेपो, गांधी चौक तटाकडील गणपती, माणगाव, नानेली, पिंगुळी, पावशी, अणाव मांजरेकरवाडी, कसाल, वागदे गणपती मंदिर आदी ठिकाणच्या गणेश जयंती उत्सवाला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी देवस्थान कमिटी व स्थानिक मंडळांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, कुडाळ उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका ज्योती जळवी, माजी नगरसेवक बाळा वेंगुर्लेकर, सचिन काळप, एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक, युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, बंड्या कुडतरकर, अवधूत मालणकर,बाळा कांदळगावकर, गणेश मेस्त्री, रामा ताम्हाणेकर, कौशल जोशी, गुरु गडकर, शैलेश काळप, जीवन बांदेकर, प्रकाश म्हाडेश्वर, सुंदर सावंत, गोपाळ सावंत, चंद्रकांत कुंभार, सचिन गोसावी, हरी घाडीगावकर, संजय परब, बाळा सावंत, सचिन परब, संजय परब, गोट्या गावडे, दीपेश खेडेकर, पुरुषोत्तम खेडेकर, राजन गावडे, रवींद्र गावडे, मदन गावडे, सुरेश नेरुरकर, बबन परब, रुपेश वर्दम, दीपक मसदेकर, बीजी गावडे, गुरुनाथ जळवी, शरद जळवी, नागेश जळवी, दिनेश गावडे, दिनेश मातोंडकर आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.