आरोग्याची नियमित तपासणी केल्यास दुर्धर आजारापासून बचाव…

78
2
Google search engine
Google search engine

डॉ.दर्शना कोलते; ध्यास फाऊंडेशनच्या तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सिंधुदुर्गनगरी,ता.१३: आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा नियमित आरोग्य तपासणी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दुर्धर आजारापासून आपला बचाव होवू शकेल. फक्त औषधावर अवलंबून न राहता आहार नियंत्रण सुद्धा महत्वाचे आहे. याच्या मार्गदर्शनासाठी आरोग्य शिबीरे फार महत्वाची आहेत, असे प्रतिपादन डॉ दर्शना कोलते यांनी ध्यास फाऊंडेशन आयोजित आरोग्य शिबीर कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले.

ध्यास फाऊंडेशन सावरवाडच्यावतीने आरोग्य शिबीर संपन्न झाले. डॉ दर्शना कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत या आरोग्य शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या आरोग्य शिबीरात डॉ दर्शना कोलते, डॉ जी टी राणे, डॉ चेतन म्हाडगुत, डॉ गोपाळ सावंत, डॉ गौरेश घुर्ये, डॉ हर्षल पवार, डॉ प्रथमेश वालावलकर, डॉ श्वेता भडंगे यानी रुग्णाची तपासणी केली. यावेळी सर्व रुग्णाची रक्त तपासणी, इसीजी व सर्वांना आवश्यक औषधे देण्यात आली. वराड परिसरातील 300 पेक्षा जास्त रुग्णानी या शिबीराचा लाभ घेतला.

बॅ नाथ पै सेवांगणचे विश्वस्त दीपक भोगटे यानी ध्यास फाऊंडेशन राबवीत असलेल्या अनेक उपक्रमांचे कौतुक करून डॉ दर्शना कोलते यांच्या साहित्य चळवळीतोल योगदानाची माहिती दिली.

वराडच्या सरपंच शलाका रावले यांनी ध्यास फाऊंडेशन व आभाळमाया ग्रुप हे वराड गावात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत आहेत. त्याला आपले नेहमीच सहकार्य राहिल व आजच्या अत्यंत आवश्यक अशा आरोग्य शिबीराच्या आयोजनाबद्दल ध्यास फाऊंडेशनला धन्यवाद दिले.

जिल्हा रुग्णालयाचे फार्मासिस्ट योगेश वारंग, रेश्मा दळवी, रुपेश धुरी, चैताली चव्हाण यांनी सहकार्य केले. या शिबीरास उपसरपंच गोपाळ परब, दादू नाईक, राजन माणगावकर, बबन पांचाळ, राकेश डगरे आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व शिबीराचे सूत्रसंचलन जयंद्रथ परब यांनी केले. ध्यास फाऊंडेशनचे संस्थापक सुरेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांनी व सावरवाड ग्रामस्थानी शिबीराचे नियोजन केले.