कटरने वार केल्‍या प्रकरणी महेंद्र चव्हाण याला पोलीस कोठडी…

183
2
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.१४: किरकोळ अपघातानंतर दुचाकी स्वारावर कटरने वार केल्‍या प्रकरणी संशयित आरोपी महेंद्र चव्हाण याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना १० फेब्रुवारीला रात्री ११.३० च्या दरम्‍यान नागवे रोडवरील माऊलीनगर येथे घडली होती.

कणकवली माऊली नगर येथे दुचाकी व ओमनी यांच्यामध्ये १० फेब्रुवारीला रात्री साडे अकराच्या सुमारास किरकोळ अपघात झाला होता. या घटनेनंतर दुचाकीवरील गौतम हिंदळेकर आणि ओमनी कारमधील महेंद्र चव्हाण यांच्यात वादंग झाला. यात संशयित आरोपी महेंद्र चव्हाण याने दुचाकी चालक गौतम धरमचंद्र हिंदळेकर याच्यावर कटरने छातीवर, पायावर, मांडीवर वार करून जखमी केले होते. तर गौतम हिंदळेकर याने महेंद्र चव्हाण याच्या हातावर दगड मारून त्याला जखमी केले होते. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून दोघांवर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल झाला होता. गौतम हिंदळेकर हा गंभीर जखमी असल्‍याने त्‍याच्यावर उपचार सुरू आहेत. तर महेंद्र चव्हाण याला कणकवली पोलिसांनी काल (ता.१३) ताब्‍यात घेतले होते. त्‍याला आज येथील न्यायालयात सादर केले. यावेळी चव्हाण याला न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज पाटील करत आहेत.