जल जीवनच्या लघु चित्रपट स्पर्धेत पत्रकार विनोद दळवी प्रथम…

113
2
Google search engine
Google search engine

ओरोस,ता.१५: जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय लघु चित्रपट स्पर्धेत मालवण तालुक्यातील आंबडोस गावचे रहिवासी तथा पत्रकार विनोद दळवी यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक संतोष बादेकर, तृतीय क्रमांक अनिकेत मिठबावकर यांनी प्राप्त केला आहे. या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ३१ हजार रुपये, २१ हजार रुपये आणि ११ हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन उद्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत खुल्या गटाकरीता लघुचित्रपट स्पर्धाचे १५ जानेवारी पर्यत आयोजन करण्यात आले होते. मात्र या स्पर्धेस अल्प प्रतिसाद मिळाल्याने या स्पर्धास ३० जानेवारी पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपले लघुचित्रपट जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे सादर करावेत, असे आवाहन विनायक ठाकुर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(पाणी व स्वच्छता) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार प्रसिध्दी करीता जिल्हास्तरीत खुल्या लघुचित्रपट स्पर्धाचे आयोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाना स्वनिर्मित लघुचित्रपट सादर करायचा होता. यातील पटकथा, दृश्य, संकल्पना, संवाद, पाश्वसंगित, गीत, चित्रिकरण स्वतः करणे बंधनकारक होते. या अगोदर प्रकाशीत झालेले किंवा व्यक्ती, संस्था, कंपनी, शासकिय विभाग त्यानी त्याच्या कामाकरीता तयार केलेले लघुचित्रपट या स्पर्धेकरीता सादर करण्यास मनाई होती. लघुचित्रपट निर्मिती करीता वापरण्यात येणारे साहित्य प्रोफेशनल दर्जाचे व उत्तम असणे गरजेचे होते. लघुचित्रपट निर्मिती करीता वापर हा प्रमाण मराठी व कोणाच्याही भावना व अस्मिता दुखावणाऱ्या नसावा, अशा अटी होत्या. या स्पर्धेकरीता ३ ते ५ मिनिट कालावधीचा लघुचित्रपट तयार सादर करायचा होता.
या स्पर्धेतील लघुचित्रपट यासाठी ‘पाण्याचे शाश्वत स्त्रोत’, ‘पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती’, ‘जल संवर्धन’, ‘हर घर जल घोषित गाव’ ‘जल जीवन मिशन यशोगाथा’, ‘विविध योजनांचे कृती संगम’ याप्रमाणे विषय देण्यात आले होते. यासाठी लघु चित्रपट सादर करण्याची मुदत ३० जानेवारी पर्यंत होती. जिल्ह्यातून एकूण १० लघु चित्रपट सादर करण्यात आले होते. यातील लघु चित्रपटांचे मूल्यमापन करून मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख आणि जिल्हा पाणी व स्वच्छ्ता मिशन उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर करून गुरुवारी त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.