डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज समन्वय समिती अध्यक्षपदी केशव जाधव…

144
2
Google search engine
Google search engine

बिनविरोध निवड; उपाध्यक्ष जगदीश चव्हाण, सचिवपदी विनायक जाधवांना संधी…

सावंतवाडी,ता.०४: विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समितीच्या अध्यक्षपदी केशव जाधव, उपाध्यक्षपदी जगदीश चव्हाण, सचिवपदी विनायक जाधव तर कोषाध्यक्षपदी लक्ष्मण कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सावंतवाडी येथील समाज मंदिर येथे सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिला समूहगीत गायन स्पर्धा, रक्तदान शिबिर, आंबेडकर व्याख्यानमाला, रॅली चित्र रथ व वर्षभरात होणाऱ्या सामाजिक कार्यक्रमांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

यावेळी बामसेफचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र जाधव, भारत मुक्ती पार्टी चे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव, भारतीय विध्यार्थी मोर्चाचे सगुण जाधव, डॉ. प्रा. देविदास बोर्ड,विलास कासकर, बौद्ध हितवर्धकचे तालुका अध्यक्ष महेंद्र सावंत, बौद्ध हितवर्धकचे सचिव आयु. तिळाजी जाधव, त्रैलोक्य महासंघाचे शांताराम असनकर, विनायक तांबळे, सद्गुरू जाधव, सिंधुदुर्ग चर्मकार उन्नत्ती मंडळचे दिलीप इन्सुलकर, जगदिश चव्हाण, भारतीय बौद्ध महासभेचे सुरेश जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे सुनील जाधव, केशव जाधव, सुरेश जाधव आदी उपस्थित होते.