शासकीय कर्मचाऱ्याला शिवीगाळ धमकी, एकाची निर्दोष मुक्तता…

245
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०७: शासकीय कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी समिर म्हाडेश्वर ( रा. ढोलकरवाडी, माणगाव ) याची निर्दोष मुक्तता केलेली आहे. या कामी ॲड. अनिल निरवडेकर, गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.

याबाबत अधिक वृत्त असे की, म्हाडेश्वर याच्या घरा समोरून सागाच्या झाडाची तोड करुन ती कापून घेवून गेल्याचा माग लागल्याने वनरक्षक यांनी संशयिताच्या घरी व आजुबाजूला चौकशी केली, त्या रागातून त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली होती. त्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, हा खटला न्यायालयात सुरू होता दरम्यान त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.