दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील ३० शाळांना लॅपटॉप…

76
2
Google search engine
Google search engine

मालवण,ता.१२: दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग मधील तब्बल ३० शाळांना ६० लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. मॉर्निंग स्टार कंपनीच्या सीएसआर फंडातून हे लॅपटॉप देण्यात आले. नुकताच मालवण येथील रामगड हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी रामगड सरपंच शुभम मठकर, दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हासुरकर, अभय प्रभुदेसाई, रामगड हायस्कूलचे श्री. वळंजू, रामगड शाळा संस्था उपाध्यक्ष सुभाष तळवडेकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, दुर्गवीर सचिव सागर टक्के, खजिनदार सुरेश उंदरे, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक अर्जुन दळवी, रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रशांत डिंगणकर, दुर्गवीर सदस्य महेश सावंत, प्रमोद डोंगरे आदी उपस्थित होते.

यावेळी दुर्गवीर प्रमुख संतोष हासुरकर यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या कार्याची माहिती देत दुर्गवीर प्रतिष्ठान सोबत गडकिल्ले संवर्धन कार्यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुलांना मोठ्या संख्येने लॅपटॉप करण्यामागचा हेतू हाच आहे की ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक साहित्य उपलब्ध व्हावे जेणेकरून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लागेल आणि भावी पिढी डिजिटली साक्षर होण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शिक्षकांच्या वतीने दुर्गवीरप्रमुख संतोष हासुरकर यांच्यासह इतर दुर्गवीरांचा सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग विभागातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.