आंबा विक्रीसाठी रिक्षा स्टॅण्डवर पर्यायी जागा उपलब्ध करून द्या…

358
2
Google search engine
Google search engine

स्थानिकांची मागणी; संजू परबांची भेट, मुख्याधिकार्‍यांकडून सकारात्मक प्रतिसाद…

सावंतवाडी,ता.१९: आंब्याच्या हंगामात दोन महिन्याच्या कालावधीसाठी स्थानिकांना मार्केट बाहेर पर्यायी जागा द्या. सहा आसनी रिक्षाच्या ठिकाणी बसण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी आज येथील स्थानिक विक्रेत्यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे केली. दरम्यान याबाबत परब यांनी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या कानावर ही बाब घातली. यावेळी आपण या मागणीबाबत विचार करुन निर्णय घेवू, असे श्री. साळुंखे यांनी सांगितले.

सावंतवाडी पालिकेच्या माध्यमातून नवे मार्केेट उभारणीचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विक्रेत्यांना इंदिरा गांधी व्यापारी संकुलाच्या खालच्या जागेत बसविण्यात आले आहे. मात्र त्या ठिकाणी ग्राहक येत नाहीत. त्याच बरोबर बाहेरून येणारे आंबा विक्रेते रस्त्यावर बसून आंबा विक्री करीत असल्यामुळे आमचा धंदा होत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन महिन्याच्या कालावधीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आज श्री. परब यांच्याकडे केली. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे उपस्थित होते.

दरम्यान याबाबत श्री. परब यांनी साळुंखे यांच्याशी चर्चा करुन योग्य तो मार्ग काढला जाईल, कोणत्याही व्यापार्‍याचे नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही घेवू. मात्र त्या ठिकाणी पर्यायी जागेत आंबा वगळता अन्य कोणत्याही गोष्टी विक्री करता येणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार चर्चा करुन आपल्याला सांगा, त्या नंतर योग्य ती भूमिका घेवू, असे श्री. परब यांनी उपस्थितांना सांगितले.

यावेळी गणेश कुडव, अमित मठकर, अनिल मठकर, विमल पावसकर, दिपिका मठकर, सागर मठकर, संगीता नार्वेकर, राजश्री कुंभार, अर्चना शिंदे, आनंद मांजरेकर, राजा खोरागडे, सुनिता नाईक, प्राजक्ता सांगेलकर, दिपाली राऊळ, दशरथ राऊळ, प्रकाश नाईक, निवेदिता शृंगारे, रंजना झोरे, सुप्रिया गोवेकर, प्रज्ञा दळवी, सीताबाई परब, सुचिता नाईक, तारामती गुडेकर आदी उपस्थित होते.